सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पत्नीला पद्मावत पाहायचाच, नवर्‍याला हवी सुरक्षा

गाझियाबाद: स्त्रीहठ्ठांपुढे भलेभले हरले आहेत. तिथे या गाझियाबादच्या पुरुषाचा टिकाव कसा बरे लागावा ! पत्नीने हठ्ठही असा केला की कोणाच्याही पोटात गोळा यावा. मला किनई पद्मावत पाहायचा आहे म्हणजे पाहायचा आहेच. अशी बायकोची विनवणी ऐकून पतीला घाम फुटला. त्याने तडक पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे सुरक्षेची हमी मागितली. पोलिसांनी त्याला सुरक्षेची हमी दिली आहे.
 
पद्मावत सिनेमा 25 जानेवरीला प्रदर्शित झाला. सिनेमाच्या विरोधात करणी सेना दंड थोपटनू उभी आहे. सिनेमा प्रदर्शनावर सिनेमागृहाचीच तोडफोड करण्याचा प्रयत्न करणी सेना करणार हे उघड आहे. परिणामी हा सिनेमा पाहायचा म्हणजे या तोडफोडीला सामोरे जायचे हे वेगळे सांगायला नको.
 
गाझियाबादमध्ये राहणारे संदीप सिंह यांनी ट्विट करुन आपल्या पत्नीची इच्छा सांगितली आणि गाझियाबादच्या पोलिसांना आवाहन केले. चक्क गाझियाबाद पोलिसांनीही संदीपच्या ट्विटला उत्तर दिले आहे. तुम्ही निश्चिंत होऊन सिनेमा पाहायला जा. गाझियाबाद पोलिस तुम्हाला सुरक्षा पुरवेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.