गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मार्च 2018 (11:19 IST)

भारताच्या आठ महिला फोर्ब्सच्या यादीत

फोर्ब्सने जगातील २५६ अब्जाधीश महिलाची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये भारताच्या आठ महिलांचा समावेश आहे. या आठ महिलांमध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो सावित्री जिंदाल यांचा. सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या चेअरमन आहेत. त्यांची संपत्ती ८.८ बिलियन डॉलर इतकी आहे. त्यांच्या खालोखाल बायोकॉनच्या किरन मुजुमदार - शॉ यांचा नंबर लागतो त्यांची संपत्ती ३.६ बिलियन डॉलर इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्मिता गोदरेज आहेत त्यांची संपत्ती २.९ बिलियन इतकी आहे. फोर्ब्सने केलेल्या सर्वेक्षणात २०१८ मध्ये भारतात १२१ अब्जाधीश लोक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १९ने वाढली आहे. फोर्ब्स मासिकानुसार भारताने अब्जाधीश लोकांच्या यादीत अमेरिका आणि चीन पाठोपाठ तिसरा क्रमांक पटाकवला आहे.