मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 5 मार्च 2020 (14:55 IST)

पुढील दहा वर्षे आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहा : उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. ठाकरे यांच्या हस्ते फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
यावेळी ठाकरे यांनी फडणवीसांना चिमटा काढत आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिले आहे. पुढील पाच-दहा वर्षे असेच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा, म्हणजे आम्हालाही नेमक्या उणिवा काय राहिल्या आहेत हे कळेल, असे मिश्किल वक्तव्य केले. मराठीत कदाचित पहिल्यांदा पुस्तक लिहिले गेले असेल असे सांगताना हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.
 
अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. सगळ्या योजनांना अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाला अर्थ असला पाहिजे, असेही ठाकरे यांनी सांगितले.