testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गरीब मुलींना लग्नासाठी योगी सरकार देणार 35 हजार रुपये आणि मोबाईल

लखनौ| Last Modified बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (09:01 IST)
गरीब मुलींच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्या पावलावर पाऊल टाकत योगी सरकारने हा निर्णय घेतला. सामुदायिक विवाह सोहळ्याअंतर्गत योगी सरकार एका मुलीसाठी 35 हजार रुपये खर्च करणार आहे.
यापैकी 20 हजार रुपये थेट मुलीच्या खात्यात जमा होतील. याशिवाय उर्वरित 10 हजार रुपये कपडे, भांडी आणि दागिने खरेदी करण्यासाठी वापरले जातील. तर 5 हजार रुपये लग्न मंडपासारख्या खर्चासाठी देण्यात येतील.

या योजनेअंतर्गत अगोदर गरीब मुलींच्या लग्नासाठी केवळ 20 हजार रुपये देण्यात येत होते. मात्र योगी सरकारने गरिबांना दिलासा देत ही रक्कम 35 हजार रुपये केली आहे. योगी सरकारकडून नवरीला एक मोबाईल फोनही भेटवस्तू म्हणून दिला जाणार आहे. एकाच वेळी पाच मुली लग्नासाठी तयार असतील तर सामुदायिक विवाह सोहळ्याप्रमाणे लग्न सोहळा करण्यात येईल.


यावर अधिक वाचा :