शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 27 जानेवारी 2015 (11:44 IST)

अमेरिकेत गुंतवणुकीसाठी भारतीयही उत्सुक :ओबामा

अमेरिकेतील उद्योजकांप्रमाणेच भारतीय उद्योजकही अमेरिकेत गुंतवणुक करण्यास उत्सुक असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले. 

तीन दिवसाच्या भारत दौ-यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतात शेती आणि इतर महत्वाच्या बाबींवर भर देणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. 

यावेळी पेप्सी को. समुहाच्या इंद्रा नुई ,मास्टर कार्डचे प्रमुख अजय बागा, मॅग्राहील फायनान्सचे अध्यक्ष हॅरोल्ड मॅग्रा यांच्यासह अमेरिकेतील ३० मोठे उद्योजक तसेच टाटाचे सायरस मिस्त्री, हनीवेल कंपनीचे अध्यक्ष डेव्हीड एम. कोटे, आयसीआयसीआयच्या मुख्य अधिकारी चंदा कोचर, उद्योजक सुनिल मित्तल एस्सार ग्रुपचे प्रमुख शशी रुईया, महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा, ज्युबलियंट लाइफ सायन्सचे प्रमुख हरी भारतीय, 
इन्फोसिसचे कार्यकारी अध्यक्ष विशाल सिक्का उपस्थित होते.