शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (11:19 IST)

... आता निलंबानावरुन गदारोळ

काँग्रेसच्या खासदारांवरील निलंबनावरुन गोंधळात आणखीनच भर पडली असून या कारवाईविरोधात विरोधकांनी एकजूट दाखवित गदारोळ केला. लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाबाहेर धरणे धरण्यात आले.

दरम्यान, या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. भाजपाने संसदीय पक्षाच्या बैठकीत लोकसभेचे कामकाज सुरू होताच डावे, सपा आणि राजद सदस्यांनी काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभाध्यक्षांनी यास परवानगी नाकारत प्रश्नोत्तराचा तास पुढे रेटला. तृणमूल काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, राजद, सपा आणि डाव्यांसह अनेक विरोधी पक्षांचे सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

दरम्यान, भाजप संसदीय पक्षाने विरोधी पक्ष नकारात्मक, गतिरोधक आणि विकास विरोधी असल्याचा आरोप करीत एक प्रस्ताव मंजूर केला.