शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (09:06 IST)

आमिरच्या घराबाहेर निदर्शने

देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पत्नी किरणने देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता, असे विधान करणार्‍या अभिनेता आङ्किर खानला घेरण्याचा प्रयत्न सुरू असून आमिरच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आज हिंदू सेनेच्या कार्यकत्र्यांनी निदर्शने केली. दरम्यान, पाटणा आणि अलाहाबादमध्येही आङ्किरविरोधात निदर्शने करण्यात आली असून दिल्लीत त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
याबाबतच्या तक्रारीत आमीर खानच्या वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिमेस धक्का पोहोचला असल्याचे नमूद केले आहे. आमीर खानला भारतात कोणाची भीती वाटते, असा प्रश्नही या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे तर बिहारमधील पाटणा येथे भाजप कार्यकत्र्यांनी आमीर खानचा पुतळा जाळून निषेध केला आहे. भाजपने आमीर खानच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. सहिष्णुता या देशाच्या डीएनएमध्ये आहे आणि आम्ही आमीर खानला कुठे जाऊ देणार नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की, असे वक्तव्य केल्याने भारताच्या प्रतिमेला धक्का बसतो. 

आमीर खानने सोमवारी एका कार्यक्रमात म्हटले होते मला वाटते की, गेल्या सहा महिन्यांत लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. देशातील सामाजिक वातावरण सध्या पूर्णपणे ठीक नाही. या वातावरणामुळेच एकदा आमीर खानच्या पत्नीने किरणने देश सोडण्याचा विषय काढला होता. ती अशा वातावरणामुळे चिंतित होती. 
भाजपने मंगळवारी म्हटले की, काही छोट्या घटनांमुळे भारताचे मूल्यमापन करू नये. पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले, आमीर खान भीत नाहीत तर भीती निर्माण करीत आहेत. ज्याप्रमाणे राहुल गांधी वक्तव्य करीत आहेत त्यावरून स्पष्ट होते की, काँगे्रस देशाला बदनाम करण्याचा डाव करीत आहे. आमीर खानलाही त्यांनी प्रश्न केला आहे, की भारत देश सोडून आमीर जाणार कुठे? जिथे जिथे जाईल तिथे असहिष्णुता असणार आहे. जगात भारतापेक्षा चांगला देश कोणताही नाही. भारतातील मुस्लिमांसाठी हिंदुस्थानपेक्षा चांगला देश नाही आणि हिंदूहून चांगला शेजारी मिळणार नाही. 
 
भारत सोडून कुठे जाणार ? : भाजप 
आमीर खान भारत सोडून कुठे जाणार आहे? तो जिथे जाईल तिथे असहिष्णुता असेल. भारतातील मुस्लिमांसाठी भारताशिवाय जगात कोणताही देश सुरक्षित नाही, असे मत भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी व्यक्त केले आहे तसेच आमीर खानला प्रश्न विचारला आहे की, आपणास कोण सल्ला देत आहे? 
 
आमीरसाठी असहिष्णू भारत कधी झाला ? : खेर 
आमीर खानच्या वक्तव्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून आमीरवर हल्लाबोल केला आहे. तू किरणला विचारलस का कुठल्या देशात तिला जायला आवडेल ? या देशाने तुला आमीर खान बनवल हे तू तिला सांगितलं का ? आमीर अतुल्य भारत तुझ्यासाठी असहिष्णू भारत कधी झाला ? मागच्या सात-आठ महिन्यांत का ? असे सवाल अनुपम खेर यांनी ट्विटरवरून आमीरला विचारले आहेत. 
 
आमीरचे विधान महत्त्वाचे : काँग्रेस 
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांबद्दल अभिनेता आमीर खानने केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. त्याने हे विधान केले म्हणून त्याला आता काँग्रेसचा माणूस ठरविले जाणार नाही, अशी मी अपेक्षा करतो, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी मंगळवारी भाजपला लगावला आहे. आमीर खानने जे वक्तव्य केले आहे त्याकडे सध्याच्या सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. तो जे बोलतो, ते जग बोलत असल्याचेही सिंघवी यांनी म्हटले आहे.