शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 13 मे 2015 (10:23 IST)

आरोप सिध्द झाले तर खासदारकी व मंत्रिपदाचा त्याग

‘कॅग’ अहवालावरून विरोधकांच टीकेचा सामना करणार्‍या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झाल्यास मंत्रिपद आणि खासदारकी सोडण्याची तयारी दर्शविली.
 
गडकरी कुटुंबीयांशी संबंधित असणार्‍या पूर्ती ग्रुपने कर्जामध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ‘कॅग’ अहवालात ठेवण्यात आल्याच्या मुद्दय़ावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना गडकरी उत्तर देत होते. जगातील कोणत्याही न्यायालयात आपल्याविरुध्द एक रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे जरी सिध्द झाले तरी केवळ मंत्रिपदच नव्हेतर खासदारकीही सोडण्याची तयारी गडकरी यांनी दर्शविली. ‘कॅग’ अहवालात आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले नाहीत. कोणताही विशेष लाभ पूर्तीने घेतलेला नाही. केवळ राजकीय संधिसाधूपणामुळे बेछूट आरोप होत असल्याचा दावा गडकरी यांनी केला. गडकरी यांनी सलग दुसर्‍या दिवशी राज्यसभेत या प्रकरणी निवेदन केले. गडकरी यांनी केलेले निवेदन ऐकू न आल्याचे काँग्रेस सदस्यांनी राज्यसभेत सांगितल्याने त्यांनी मंगळवारी पुन्हा निवेदन केले.
 
काँग्रेस सदस्यांनी वारंवार ‘कॅग’ अहवालाच्या चौकशीची मागणी करीत गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी आहे.