शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (10:27 IST)

इशरत जहाँ दहशतवादीच

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरु असलेल्या साक्षीत डेव्हिड हेडलीने इशरत जहाँचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची सदस्य असल्याचा दावा हेडलीने केला आहे.
 
आपल्या साक्षीमध्ये हेडली म्हणाला,  इशरत जहाँ आणि अन्य काही लोक गुजरातमध्ये घातपात घडविण्यासाठी दाखल झाले होते. तिचे नेतृत्व अबू आयमाची आई करत होती. २६/११ हल्ल्याचा मास्टरमार्इंड झकी-उर-रहमान-लख्वी याने हेडलीला मुझम्मिलच्या फसलेल्या ऑपरेशनबद्दल माहिती दिली. ह्या ऑपरेशनमध्ये एक महिला सहभागी होती, मात्र ऑपरेशनपूर्वीच तिला पोलिसांनी मारल्याचे माझ्या ऐकण्यात आले, असे हेडलीने न्यायालयाला सांगितले. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हेडलीला तीन नावे सांगितली.
त्यातील दुसरे नाव इशरत जहाँचे होते. त्यावर हेडलीने पटकन सांगितले की, दुसरे नाव. त्या महिलेचे नाव इशरत जहाँ होते.