शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 (19:19 IST)

एनडीएला पहिला झटका, कुलदीप बिष्णोईंचे भाजपला सोडचिठ्ठी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारल तगडा झटका बसला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पहिली फूट पडली आहे. ती म्हणजे हरियाणातील हरियाणा जनहित काँग्रेसने (हजकाँ) भाजप सोबतचे तीन वर्षे जुने संबंध तोडले आहेत. बिष्णोई यांनी भाजपशी फारकत घेतली आहे. हजकाँचे नेते कुलदीप बिष्णोई यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे.

भाजपचा इतिहास तपासला तर हा एक विश्वासघात करणारा पक्ष आहे. अशा विश्वासघाती पक्षाला सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढू शकत नसल्याचे कुलदीप बिष्णोई यांनी म्हटले आहे. भाजपने बिष्णोई यांच्यावर पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन म्हणाले, 'हरियाणाच्या जनतेला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे. तेथील जनता काँग्रेसवर नाराज आहे. त्यामुळे जे त्यांच्या आसपास देखील आहेत, जनता त्यांना देखील स्विकारणार नसल्याचे बिष्णोथई यांनी म्हटले आहे.