शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जम्मू , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (11:04 IST)

जम्मूत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये झालेल्या बारा तासांच्या भयंकर चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. यात तीन जवानही शहीद झाले आहेत. या गोळीबारात तीन निष्प नागरिकांचा प्राण गेला आहे.
 
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राजेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 दहशतवादी लष्कराच्या वेशात भारतीय हद्दीत दोन किमी अंतरापर्यंत घुसले. सर्वप्रथम अतिरेक्यांनी टीए बटालियनच्या एका चौकीवर हल्ला केला. त्यानंतर दहशतवादी बंकरमध्ये लपले. यादरम्यान दहशतवाद्यांनी एका कारवर हल्ला केला. त्यात दोघांचा मृत्यु झाला. शेतात काम करत असलेल्या एका नागरीकावर गोळ्या झाडल्या. या दहशतवाद्यांविरोधात लष्काराने दिवसभर कारवाई केली. नंतर लष्कराने रणगाड्याने बंकर उद्धवस्त केले.