शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 5 मार्च 2015 (19:40 IST)

'तो’ माहितीपट दाखविला

भारत सरकारने बंदी घातली असतानाही ‘बीबीसी’ वाहिनीने निर्भया प्रकरणावरील माहितीपटाचे इंग्लंडमध्ये प्रसारण केले. भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास हे प्रसारण करण्यात आले. 
 
पत्रकार लेस्ली उडवीन यांनी ‘इंडियाज डॉटर’ हा माहितीपट केला असून यात निर्भयावर बलात्कार करणार्‍या   मुकेश सिंहची मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये मुकेश सिंहने त्यांच्या विकृती मानसिकतेचे समर्थन करणारे विधान केल्यामुळे गदारोळ निर्माण झाला आहे. हा माहितीपट ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त जगभरात प्रसारित करण्यात येणार होता.