शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पणजी , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (12:27 IST)

दादरी घटनेने भाजपची प्रतिमा मलिन : पर्रीकर

उत्तर प्रदेशातील दादरीमध्ये गोमांसच्या अफवेतून झालेल्या हत्याकांडामुळे भाजपच्या प्रतिमेला जबर धक्का बसला आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. दादरी हत्याकांडासारखी घटना सरकारला आणि पक्षाला नुकसानदायक ठरणारी आहे. अशा घटनांमुळे देशाच्या विकासाचे पंतप्रधानांनी बघितलेले स्वप्न बाजूला पडेल आणि देश अशा घटना सहन करू शकणार नाही, असे पर्रीकर म्हणाले.