शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (11:01 IST)

'दिल्ली' मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपने दिली होती - कुमार विश्वास

'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी असा दावा केला आहे की 'भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती'. तसेच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असे आपल्याला सांगण्यात आल्याचे विश्वास यांनी म्हटले आहे. भाजपाने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन दिवसांनी गाझियाबाद येथील निवासस्थानी पहिल्यांदाच खासदार बनलेल्या नेत्याने विश्वास यांची भेट घेतली होती. विश्वास यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. '१९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास एक खासदार माझ्या घरी आले होते. पहाटे साडेतीनपर्यंत ते मला समजावत होते की भाजपचे सरकार बनवण्यासाठी मी मदत करावी. मुख्यमंत्री म्हणून मला समर्थन देण्यास ते तयार आहेत, असेही त्यांनी मला सांगितले', असे विश्वास म्हणाले.