शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आजारी; आज ऑफिसला दांडी

WD
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारपासून 102 डिग्री ताप आहे. प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे केजरीवाल आज (सोमवारी) कार्यालयात जाऊ शकत नाही, असे केजरीवाल यांनी स्वत: ट्विट करून सांगितले आहे.

दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे प्रकृतीच्या ठिक नसल्याने पहिल्याच दिवशी कार्यालयात पोहोचू न शकल्याने दु:ख व्यक्त केले आहे. आज कार्यालयात जाणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्‍याचा सल्ला ‍िदला आहे.

केजरीवाल आज दिल्‍लीतील प्रत्येक कुटूंबाला दररोज 700 लीटर पाणी विनाशुल्क देण्याची घोषणा करणार होते. दिल्‍ली जलप्राधीकरणाच्या अधिकार्‍यांसोबत केजरीवाल यांची बैठक होती. दुसरीकडे, महिला बाल विकास मंत्री राखी बिर्ला ऑटो रिक्षाने सचिवालय पोहोचल्याचे वृत्त आहे.