1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2014 (17:01 IST)

दिल्लीत मिझोराममधील तरूणीची निर्घृण हत्या

मिझोरामच्या एका तरूणीची ‍निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.  लव्ह-इन-रिलेशनशिपमधून हे हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दक्षिण दिल्लीमधील मुनिरका भागात ही घटना घडली. 
 
मुनिरका भागातील एका फ्लॅटमध्ये 24 वर्षांची तरुणी व वीरेंद्र सिंह हे गेल्या काही महिन्यांपासून लव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. गुरुवारी मध्यरात्री तरुणीची हत्या झाल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी गेल्यानंतर तरुणीला  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच तिची हत्या झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तरुणीचा लव्ह इन रिलेशनशिप पार्टनर वीरेंद्र सिंह हा फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.