शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (11:36 IST)

नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ राहाणार एकाच खोलीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क अर्थात दक्षिण आशियाई सहकार्य परिषदेत सहभागी होण्यासाठी नेपाळमध्ये जाणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे देखील सार्क परिषदेत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे 26 आणि 27 नोव्हेंबरला नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये होणार्‍या  सार्क संमेलनात मोदी आणि शरीफ हे दोघे नेते दोन दिवस एकाच खोलीत राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.  
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी कोणतेही निवेदन दिलेले नाही. पण तरीही दोन्ही नेते दोन दिवसांसाठी एकाच खोलीत राहणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेते एकाच खोलीत राहणार असल्याने औपचारिक नसली तरी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार हे निश्चितच मानले जात आहे.