शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 2 ऑक्टोबर 2014 (15:35 IST)

नरेंद्र मोदींचे 'स्वच्छ भारत' अभियानास प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानास महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रारंभ केला. राजधानी दिल्लीतील वाल्मिकी वस्तीचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला. राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहून मोदी वाल्मिकी मंदिरात पोचले. तेथे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. 
 
नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. महात्मा गांधी यांचे स्वप्न 2019 पर्यंत साकार करण्यासाठी लोकचळवळ बनवण्याचे आवाहन मोदींनी यावेळी केले. केंद्र सरकारचे 31 लाख कर्मचारी विविध सार्वजनिक समारंभांमध्ये स्वच्छतेची शपथ घेतली. याशिवाय राज्य सरकारच्या लक्षावधी कर्मचारीही या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभागी होणार आहेत. 
 
राष्ट्रपती भवनातील सर्व कर्मचारी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सामील झाले. त्यांनी संपूर्ण राष्ट्रपती भवन परिसर स्वच्छ केला. दरम्यान, या अभियानाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इंडिया गेटे येथे विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
 
शास्त्रीजींप्रमाणेच गांधीजींनीही 'क्विट इंडिया, क्लिन इंडिया' हे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले असले तरीही 'स्वच्छ भारताचे' स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, आता आपण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प करूया असे आवाहनही मोदींनी केले.