शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (11:45 IST)

नवजोतसिंग सिद्धू रुग्णालयात दाखल

माजी टेस्ट क्रिकेटर आणि भाजप नेता नवजोत सिंह सिद्धू यांना मंगळवारी पायातील एका नसेत रक्त गाठल्यामुळे उपचारासाठी इंद्रप्रस्थ अपोलो दवाखाण्यात दाखल करण्यात आले आहे.  
 
हॉस्पिटलने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार या आजारावर वेळीच उपाय झाले नाहीत तर जीवितास धोका निर्माण होतो. रक्तवाहिन्यांत या गाठी अडथळा निर्माण करतात व रक्तप्रवाह अडतो. संबंधित आजाराला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. सुरुवातीच्या उपचारानंतर सिद्धू यांची प्रकृती स्थिर असून त्यांचे रक्त पातळ केले जात आहे. वेदना होऊन अंग सुजणे हे या आजाराचे लक्षण आहे. दरम्यान रुग्णालयात उपचार घेणा-या सिद्धू यांनी ‘दु:खी असलो तरी निराश नाही. जीव धोक्यात घालणा-या या आजारातून देवाच्या कृपेने बरा होईन. आयुष्य महत्त्वाचे आहे. प्रार्थनेने त्याची काळजी घ्या’, असे ट्विट केले आहे.