शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 2 जून 2016 (10:45 IST)

नेतृत्त्व बदल; राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष?

काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाची वेळ आली आहे, असं सूचक वक्तव्य पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. मात्र या वृत्तावर काँग्रेसकडून परिपत्रक जारी करुन राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

पक्षाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनण्यास तयार आहे. याबाबत काही आठवड्यातच निर्णय घेतला जाईल. राहुल धुरा सांभाळण्याआधी पक्षाच्या सरचिटणीस, सचिव, विभागप्रमुख आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. राहुल गांधी या सर्व नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब करतील.
काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी चिंतन शिबीर घेणार आहेत. या शिबीरात अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा केली जाणार आहे. तसंच पक्षाचं ध्येयधोरणही ठरवलं जाईल.