शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पुढील तीन महिन्यांत इस्त्रोकडून चार उपग्रह

नवी दिल्ली- उपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा धडका कायम असून, पुढील तीन महिन्यांमध्ये आणखी चार उपग्रह अवकाशात झेपावणार आहेत. इस्त्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक मिलस्वामी अण्णादुराई यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
 
अण्णादुराई म्हणाले, ऑगस्ट 2015 पासून ऑगस्ट 2016 पर्यंत भारताने दहा उपग्रह अवकाशात सोडले आहेत. आता सप्टेंबरमध्ये इन्सॅट 3 डी आर आणि स्कॅटसॅट- 1 हे उपग्रह, तर ऑक्टोबरमध्ये जीसॅट- 18 आणि नोव्हेंबरमध्ये रिसोर्ससॅट- 2 ए हे उपग्रह सोडले जातील. पुढील तीन वर्षात 70 उपग्रह अवकाशात सोडण्याचे इस्त्रोचे नियोजन असून त्यानुसार काम सुरू आहे.