शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: हैजराबाद , गुरूवार, 24 जुलै 2014 (14:11 IST)

पॅसेंजर- स्कूलबसच्या धडकेत 25 विद्यार्थी ठार

गुरूवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास तेलंगणमधील मेडक जिल्ह्यातील कामा रेड्डी स्थानकाजवळ एक्स्प्रेस ट्रेनची स्कूलबसला धडक बसून झालेल्या अपघातात 25 ठार झाले आहेत. मृतांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह वाहनचालकाचाही समावेश आहे. सर्व मृत विद्यार्थी ककातिया शाळेतील आहेत.

मेडक जिल्ह्यातील मसईपेठ गावाजवळ एक स्कूलबस रेल्वे रुळ पार करत असताना नांदेड-हैदराबाद पॅसेंजरची बसला जोरदार धडक बसली. यावेळी बसमध्ये ४० ते ५० विद्यार्थी अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.