शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

बिहार विधानसभेत बाळासाहेबांना श्रद्धांजली

WD
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बिहार विधानसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि मिल्कमॅन विर्गस कुरियन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या उपस्थितीत विधान परिषदेतही बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंग म्हणाले, की शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे मराठी लोकांच्या कल्याणासाठी संघर्ष केला. छटपूजा महोत्सवादरम्यान चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 17 जणांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.