शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 26 मे 2015 (14:03 IST)

बॅँक कर्मचार्‍यांना 15 टक्के पगारवाढ

43 बँकांमधील जवळपास 10 लाख कर्मचार्‍यांना 15 टक्के पगारवाढ करण्याच्या करारावर इंडियन बँक असोसिएशनने सही केली. बँक कर्मचारी व अधिकार्‍यांच्या संघटनांशी झालेल्या या करारामुळे 8370 कोटींचा बोजा बँकांवर पडणार आहे. 1 नोव्हेंबर 2012 पासून कर्मचार्‍यांना फरक मिळणार आहे. केवळ 15 टक्के वेतनवाढीचा विचार केला तर 4725 कोटींचा बोजा पडणार असल्याचे आयबीएचे चेअरमन टी. एम. भसिन यांनी सांगितले. बँक कर्मचार्‍यांना लवकरच दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सुटी मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. कर्मचारी व अधिकार्‍यांच्या 11 संघटनांनी या वेतनवाढीच्या करारात सहभाग नोंदविला आहे.