शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2016 (11:27 IST)

भारत दहशतवादापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही तर पाकिस्तान समोर तर नाहीच नाही - पंतप्रधान

भारतावर दहशतवादी पाकिस्तान सातत्याने हल्ला करीत आहे. आत्तापर्यंत भारतावर पाकिस्तानने17 वेळा असा हल्ला केला आहे. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही व येणारही नाही. भारत दहशतवादापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले. 
 
केरळमधील कोझिकोड इथल्या भाजप राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत मोदी बोलत होते. या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शहर विकासमंत्री वेंकय्या नायडू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 
 
मोदींनी उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानाला चांगलेच खडेबोल सुनावले. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असतोच आणि हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे . उरीमध्ये घडवण्यात आलेला दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही हे पाकिस्थानला मोदींनी ठामपणे सागितले आणि लवकरच उत्तर मिळेल असे देखील त्यांनी नमूद केले आहे. 
 
पाकिस्तानला निर्दोष लोकांना मारायचे आहे. तसंच अफगाण, बांगलादेशमध्येही पाकिस्तानचेच दहशतवादी आहेत. पाकिस्तानला आशिया रक्तरंजित करायचा आहे. आत्तापर्यंत पाकिस्तानचे 110 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. 
 
त्याचबरोबर, भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांच्या कार्याचा आम्हाला गर्व आहे. जवानांची शक्ती हे हिंदुस्थानचे मनोबल आहे, असं म्हणत मोदींनी भारतीय जवानांचा कौतुक केला आहे.तर देशवासियांना मोदींनी आश्वासित केले आहे.