शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (11:21 IST)

भारत म्हणाला, दाऊद आणि हाफिज सईदला आमच्या ताब्यात द्या!

दहशतवादाविरूध्द लढा देणविषी पाकिस्तान खरंच गंभीरपणे विचार करत असेल तर त्यांनी सर्वप्रथम हाफिज सईद आणि दाऊदला भारताच्या ताब्यात द्यावे, असे केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. ते गुरुवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यासाठी हाफिज सईद तर 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दाऊद इब्राहिम हे दोघेजण भारताला हवे आहेत. दोघेहीजण सध्या पाकिस्तानमध्ये वास्तवला आहेत.
 
मंगळवारी पाकिस्तानच्या पेशावर येथील लष्करी शाळेवर तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला करून अनेक विद्यार्थ्यांची हत्या केली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाविरूध्द कडक पाऊले उचलणार असल्याचे सांगितले होते. व्यंक्या नायडू यांनी शरीफ  यांच्या व्यक्तव्यचा आधार घेत, हाफिज सईद आणि दाऊदला सोपविण्यास सांगितले. दहशतवादाविरूध्दच्या लढाईत पाकिस्तान गंभीर असल्याचे सिध्द करण्यासाठी नवाज शरीफ ही संधी नक्कीच गमावणार नाहीत, असे नायडू यांनी म्हटले. हाफिज सईद हा मानवतेचा शत्रू असून तो जागतिक दहशतवादाचा प्रवर्तक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.