शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (17:40 IST)

भारतात दहशतवादी हल्यांची शक्यता

दहशतवादी संघटनांना हाताशी धरुन आयएसआयने (पाकिस्तानची गुप्तचर संघटना) भारतात मोठे हल्ले करण्याचा कट रचला असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. 
 
लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहंमद या तीनही संघटनांच्या म्होरक्यांची आयएसआयने एक बैठक बोलावली होती. भारतात दहशतवादी हल्ल्यांसाठी ३० दहशतवाद्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पेशावर येथून नियंत्रण रेषेजवळ सोडण्यात आले आहे. मार्गात बर्फ जमा होण्यापूर्वी भारतात घुसण्याच्या सूचनाही आयएसआयने त्यांना दिल्या असल्याचे वृत्त आहे.