शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

मध्य प्रदेशात 'सिमी'चे पाच दहशवादी अटकेत

WD
मध्य प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाने स्टुडेंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमी) पाच दहशतवाद्यांना आज (मंगळवारी) पहाटे अटक केली. सिमीवर देशात बंदी घालण्यात आली आहे. बडवानी जिल्ह्यातील सेंधवा पठार भागात झालेल्या चकमकीनंतर या सर्वांना अटक करण्यात आली, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

अबू फैजल, इरफान नागौरी, खलिद अहमद यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते फरार होते. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख संजीव सामी यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून सेंधवा भागामध्ये सिमीच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून होते. अबू फैजल हा याचवर्षी ऑक्टोबरमध्ये खांडवा कारागृहातून पळून गेला होता.