शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2015 (12:56 IST)

'मन की बात' 26 एप्रिलला

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात‘ हा कार्यक्रम 26 एप्रिलला होणार आहे. पंतप्रधानांनी आज ट्विटरवर 26 एप्रिलला रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात‘ या कार्यक्रमातून संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले.

यंदाच्या ‘मन की बात‘ कार्यक्रमात मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत, ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

पंतप्राधानांनी यापूर्वी काळा पैसा, परीक्षा, शेतकरी अश्या विविध विषयांवर या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे अध्यक्ष प्रथमच रेडिओवर ‘मन की बात‘ या कार्यक्रमातून एकत्र आले होते.