शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , सोमवार, 15 फेब्रुवारी 2016 (10:49 IST)

माकप मुख्यालयावर हल्ला

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राजकारणावरून वातावरण तापले असतानाच युवकांच्या एका गटाने येथील माकप मुख्यालयावर हल्ला केल्याने तणाव निर्माण झाला आहे.
 
या युवकांनी माकप मुख्यालयावर हल्ला मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच हल्ला केला आणि त्यांनी मुख्यालयावर दगड फेकले, असा आरोप माकपने केला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने आपण आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे.