शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 24 जानेवारी 2015 (14:24 IST)

माजी पंतप्रधानांकडून देशाच्या सुरक्षेशी तडजोड

काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली असल्याचा धक्कादायक आरोप संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले आहे. या विधानाला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. 
 
पर्रीकरांच्या या विधानावर काँग्रेसने तीव्र रोष व्यक्त केला आहे. गेल्या सहा दशकांमध्ये बहुतांश कालावधीसाठी काँग्रेस सत्तेवर राहिली. त्यामुळे पर्रीकर यांनी स्पष्टपणे नावे घ्यावी अन्यथा, माफी मागावी अशी मागणी केली आहे.
 
गेल्या महिन्यात नववर्षाच्या पहाटे पोरबंदरवर परिसरात घुसलेल्या बोटविरोधात कोस्ट गार्डने ऑपरेशन राबवले होते. त्यावेळी पाकिस्ताच्या त्या बोटीवर असलेल्या चौघांनी त्या बोटीवर स्फोट घडवत बोट उडवून दिली होती. त्यात चौघांचाही मृत्यू झाला होता. या हल्ल्यासंदर्भात अधिक माहिती देण्यास पर्रीकरांनी नकार दिला आहे. तसे केल्यास माहितीच्या स्नेताला धोका असल्याचे पर्रीकर म्हणाले. अशाचप्रकारे यापूर्वीच्या काही पंतप्रधानांनी सुरक्षेसंदर्भातील हितांशी तडजोड केल्याचे पर्रीकर म्हणाले होते. पर्रीकर यांनी मोघम आरोप करणपेक्षा थेट नाव जाहीर करावे, असे आव्हान दिले आहे.