शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (10:35 IST)

मेट्रोच्या भाडेवाढीला तूर्त ‘ब्रेक’

मेट्रो भाडेवाढीच्या याचिकेवरची सुनावणी २४ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने भाडेवाढीला तूर्त ब्रेक मिळाला आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या स्पष्टीकरणासाठी गेल्या सुनावणीच्या वेळी न्या. अभय ओक व न्या. सी.व्ही. भडंग यांनी या मेट्रो भाडेवाढीसंदभार्तील याचिकेरवील सुनावणी तहकूब केली. कालच्या सुनावणीवेळी एमएमआरडीए आणि रिलायन्सने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला असून, पुढील आठवड्यात यावर सुनावणी होईल, अशी माहिती खंडपीठाला दिली. त्यामुळे खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.