शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शुक्रवार, 29 एप्रिल 2016 (10:59 IST)

मोदींच्या मेणाच्या पुतळयाचे आज अनावरण

लंडनमधील जगप्रिसद्ध मादाम तुसाँ संग्रहालयातील टीमने बनवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेणाच्या पुतळयाचे लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात आज अनावरण होणार आहे.

खादीचा कुडता आणि त्यावर जॅकेट घातलेले मोदी राजकीय सभांमध्ये उपस्थित जनसमुदायाला ज्या पद्धतीने नमस्कार करतात तीच पोझ या मेणाच्या पुतळयाची आहे. प्रसिद्ध जागतिक नेते आणि बॉलिवूड कलाकारांचे मेणाचे पुतळे या म्युझियममध्ये आहेत. मागच्या आठवडयात सिंगापूर, हॉंगकॉंग आणि बँकॉकमधील मादात तुसाँ संग्रहालयात मोदींच्या पुतळयाचे अनावरण झाले. लंडनला हा पुतळा नेण्याआधी मोदींना हा पुतळा दाखवण्यात आला.