शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 19 मार्च 2016 (10:52 IST)

मोदींपाठोपाठ कपिल शर्माचा मेणाचा पुतळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल कार्यक्रमामुळे घराघरात पोचलेला लोकप्रिय अभिनेता कपिल शर्माचाही मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसॉद मेणाच्या पुतळ्यांच्या  म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे.
 
जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा या म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे. त्यांचे मोजमाप घेण्यासाठी म्युझियमचे कलाकार नुकतेच भारतात आले होते. त्याचवेळी त्यांनी कपिलचेही मोजमाप घेतल्याची माहिती मनोरंजनविषयक वृत्त देणार्‍या वेबपोर्टलवर दिली आहे. मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिअट या हॉटेलमध्ये कलाकारांनी कपिलची भेट घेतली.
 
या म्युझियममध्ये यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या रॉय बच्चन, शाहरूख खान, कतरिना कैफ, करिना कपूर, हृतिक रोशन आणि माधुरी दीक्षित या तारकांचा समावेश आहे. आता त्यामध्ये कपिलच्या पुतळ्याची भर पडणार आहे. 
 
कपिलने छोटय़ा पडद्यावरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले.