शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

येथे आहे देशातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट

अहमदाबादमध्ये देशातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरंट सुरू झालंय. जमिनीच्या खाली वीस फुटांवर हे रेस्टॉरंट आहे. सरदार पटेल रिंग रोडवर सनिसिटीजवळ हे रेस्टॉरंट बनवण्यात आलंय. 
 
या रेस्टॉरंटसाठी एक लाख 60 हजार लिटर पाण्याचा वापर करण्यात आलाय. एखाद्या अँक्वेरियमसारखाच त्याचा लूक आहे. हे रेस्टॉरंट उभारण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा खर्च आलाय. 
 
रेस्टॉरंटमध्ये खाता खाता वेगवेगळ्या प्रकारचे मासेही इथे पर्यटकांना पाहता येतील. तसेच या रेस्टॉरंटमध्ये ऑनलाइन बुकिंगची सुविधा आहे. यासोबत तुम्ही येथे पंजाबी, थाय, मेक्सिकन आणि चायनीज जेवणाचा आनंद घेऊ 
 
शकता.