शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 6 जून 2014 (10:55 IST)

योगेंद्र यादवांना आप संपवायचाय – सिसोदिया

आम आदमी पक्षाच्या (आप) दोन ज्येष्ठ नेत्यांचे अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. मनिष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सिसो‍दियांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर योगेद्र यादव यांच्या डोक्यावर फोडले आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक यांना ‍दिल्लीतील जनतेची सेवा करायची होती. लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. तरी देखील योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्यावर दबाब टाकून निवडणूक लढवण्यास त्यांना प्रवृत्त केले. पक्ष आणि केजरीवाल यांना संपवण्याचा योगेद्र यादव यांचा इरादा असल्याचा घणाघाती आरोप सिसोदियांनी केला आहे. 

सिसोदियांचे एक पत्र मीडियासमोर आले आहे. दुसरीकडे, आज (शुक्रवार) सकाळी 10 वाजता 'आप'च्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पक्षाच्या दोन्ही नेत्यांमध्ये सुरु झालेल्या वादाविवादवर कार्यकारिणीत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

मनिष सिसोदिया यांनी आपले सहकारी योगेंद्र यादव यांच्यावर पक्षात गटबाजी आणि कुरापती करण्याचा आरोप ठेवला आहे. 'आप'च्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे मीडियासमोर आलेल्या या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. सिसोदिया यांनी योगेंद्र यादव यांच्यावर पक्षात गटबाजी करत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत हरियाणात पक्षाचे नेतृत्त्व करणारे नवीन जयहिंद यांची दिशाभूलही करण्‍याचा आरोप केला आहे. सिसोदिया यांनी आपल्या पत्रात हरियाणाचे नेते नवीन जयहिंद आणि योगेंद्र यादव यांच्यात सुरु असलेल्या वादविवादाचा उल्लेख केला आहे.