शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चंडिगड , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:23 IST)

रामपालला 28 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयिन कोठडी

स्वयंघोषित अध्यात्मिक बाबा रामपालचा जामीन अर्ज पंजाब आणि हरियाणा हायकोर्टने गुरुवारी फेटाळला. नंतर दुपारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने रामपालला 28 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

रामपालच्या आश्रमावर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्यास हायकोर्टाने पोलिसांना निर्देश दिले. या कारवाईत जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहितीही मागितली आहे. हरियाणाच्या प्रधान सचिवांना रामपाल यांच्या संपत्तीची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. हरियाणात अशा स्वरुपाचे किती आश्रम आहेत, तेथे बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत का, बेकायदेशीरपणे शस्त्रे ठेवली जात आहेत का, अशी माहितीही मागितली आहे.

बाबा रामपालला अटक करण्यासाठी राबविण्यात आलेल्या पोलिस कारवाईवर सुमारे 50 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. बाबावर आरोप सिद्ध झाले तर ही रक्कम त्याच्या संपत्तीतून वसूल केली जाण्याची शक्यता आहे. सध्या रामपालकडे सुमारे 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे.  

बाबा रामपाल, त्याचा प्रवक्ता, आश्रम प्रबंधक समितीचे पदाधिकार्‍यांवर देशद्रोहाच्या गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याशिवाय व्यतिरिक्त 19 कलमेही लावण्यात आली आहेत. यामुळे रामपालला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.