शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2016 (16:30 IST)

राहुल गांधींच्या खाटवर हल्ला, पळवापळवी

देवरिया- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ‘खाट सभा‘ अजून संपलीही नव्हती की खाटांवर बसलेले लोकं खाट लुटण्यासाठी हल्ला करायला लागले.
इकडे राहुल गांधी रवाना झाले आणि लोकांनी सभेसाठी आणलेल्या खाटांची पळवापळवी सुरू केली. कार्यक्रमातील खाटा कोणाच्या यावरूनही अनेकांमध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
 
‘खाट पे चर्चा’ ही कांग्रेसच्या रणनीतीतज्ञ प्रशांत किशोर यांच्या डोक्याची उपज आहे. शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला बसण्यासाठी खाटा आणल्या होत्या. मात्र, सभेनंतर खाटा नेण्यासाठी पळापळ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. 
 
काँग्रेस पदाधिकार्‍यांनी सांगितले की, पक्षाने कार्यक्रमासाठी दोन हजार खाटा आणल्या होत्या. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांनी त्या पळविल्या. यावेळी काहींमध्ये वादही निर्माण झाला होता.
 
‘खाट पे चर्चा’ ही मोदींच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे प्रत्युत्तर मानले जात आहे. पण खाटांमुळे झालेल्या हल्ल्याला बघून हा डाव उलट पडलेला दिसतोय. सूत्रांप्रमाणे अनेक लोकांमध्ये खाट नेण्यावरून वाद निर्माण झाला की काही लोकांना तिथेच खाट तोडूनदेखील टाकल्या.