शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 1 डिसेंबर 2014 (10:57 IST)

रेल्वे मुख्यालय ‘आपली मुंबई’तच

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे नेण्याचा प्रस्ताव नसल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  यांनी स्पष्ट केले आहे. जाहीर केले आहे.
 
मुंबईतील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे नेण्याच्या भाजपा खासदाराच्या मागणीला सर्वच स्तरातून जोरदार विरोध झाल्यानंतर प्रभू यांनीच खुलासा करण्यासाठी प्रसिध्दीपत्र काढले आहे.
 
प्रभू यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय अहमदाबाद येथे नेण्याचा प्रस्ताव नाही. रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कुठलाही प्रस्ताव पुढे सरकू शकत नाही. त्यामुळे या चर्चेला आता पुर्णविराम द्यावा.