शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 एप्रिल 2014 (11:06 IST)

लालकृष्ण अडवानी यांची वेबसाईट हॅक

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची अधिकृत वेबसाईट हॅक झाल्याचे सोमवारी (21 एप्रिल) उघडकीस आले. अडवानी यांची www.lkadvani.in अशी वेबसाइट आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी अडवानींची वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. मोहम्मद बिलाल असे हॅकर्सचे नाव आहे.

मोहम्मद बिलाल याने अडवानींची वेबसाइट हॅक करून त्यावर 'फ्री काश्‍मीर' व 'पाकिस्तान झिंदाबाद' असा मजकूर अपलोड केला आहे. शिवाय, काश्मीरमधील लष्कराच्या प्रभावाखालील प्रशासन मागे घेण्याचे सांगितले आहे.