1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लावणीच्या तालावर खवय्ये इंदूरी

इंदूर शहराशी मराठी इतिहास जुळलेला आहे. होळकर कुटुंबामुळे इंदूर हे महाराष्ट्राच्या जवळचे वाटणारे शहर आहे. आजही येथे मोठ्या संख्येत मराठी लोकांची वस्ती आहे. त्यातील लोकांचा मराठमोळेपणा जिवंत राहावं म्हणून काही सामाजिक संस्था लोकांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न करत असतात. मग ते नाटक, चित्रपट, मराठी भाषेची परीक्षा किंवा कला- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असो वा लोकांना मराठी स्वाद देण्याची जिद्द असो. कारण इंदूर येथील लोकं खाण्यासाठी जगतात हे किस्से सर्वदूर पसरत आहे.

त्याचबरोबर मराठी खमंग पदार्थांची चव आणि संस्कृती येणार्‍या पिढीपर्यंतही पोहचावी यासाठी मराठी सोशल् ग्रुप द्वारे येथे दरवर्षी एक अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात येतं. दरवर्षी दिवाळीआधी भरणारा जत्रा लोकांमध्ये उत्साह भरून जातो. कुटुंबासह लोकं येथे येऊन मराठी पदार्थांचा स्वाद घेत लावणीच्या तालाचा आनंद लुटतात.
सोलकढी, उब्जे, झुणका-भाखर-ठेचा, गुळाची पोळी, पुरणपोळी, चिरोटे, थाळीपीठ, भरडा वडा, वाटली डाळ, गाकर भरीत, चकली, पातळभाजी-पोळी, वरण मुटकुळे, कोथिंबीर वडी, सुरळीची वडी, बासुंदी, अनारसे, साटोर्‍या, पातोडी-पोळी, अप्पे आणि भाकरी-भरली वांगी या पदार्थांसह अनेक पदार्थांचा सुवास लोकांना येथे तिन्ही दिवस ओढून आणतो. कारण या जत्रेच्या मजा घेण्यासाठी त्यांना पुन्हा एक वर्ष वाट पाहावी लागते.