शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

वधूची 'परीक्षा', वर करत होता प्रतीक्षा...!

राजस्थानच्या सीकर येथे सुनीता नावाची वधू लग्नाच्या परिधानात परीक्षा देण्यासाठी सेंटरवर पोहचली तर आपोआपच सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. ती येथे स्नातकच्या अंतिम वर्षाची परीक्षा देण्यासाठी आली होती.
सुनीता हिचं लग्न 28 एप्रिल रोजी झाला असून 29 एप्रिलला तिची परीक्षा होती. हेच कारण आहे की सासरी जाण्यापूर्वी ती सरळ परीक्षा केंद्रावर पोहचली. यादरम्यान तिचा नवराही तिच्यासोबत होता. सुनीताला परीक्षेला बसायचे आहे आणि याचे महत्त्व जाणून त्याने विदाई झाल्यावर गाडी घरी नेण्याआधी सरळ कॉलेजमध्ये थांबवली.
 
जोपर्यंत सुनीता परीक्षेला बसली होती तोपर्यंत तिचा पती सेंटरच्या बाहेर तिची वाट पाहत होता.