शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2015 (12:28 IST)

वादाची ठिणगी जुनीच!

‘आप’मधील कलह आता समोर येत असला तरी त्याची बीजे दिल्लीच्या निवडणुकीपूर्वीच पडल्याचे सांगण्यात येते. दिल्लीशिवाय अन्य काही राज्यांत ‘आप’ने निवडणुका लढवाव्यात, असे यादव यांचे मत होते. मात्र, त्याला केजरीवाल यांनी विरोध केला होता. तिथूनच संघर्षाची ठिणगी पडली होती. 
 
केजरीवाल गट सक्रिय 
केजरीवाल यांनी वादापासून दूर राहण्याची भूमिका घेतली असली तरी पक्षातील त्यांचा पाठीराखा गट सक्रिय झाला आहे. या गटाने यादव यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवायांचे पुरावे गोळा करण्यात सुरुवात केली आहे. आज (4 मार्च) होणार्‍या ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना उघडे पाडण्याची तयारी केजरीवाल समर्थकांनी केली आहे. याच बैठकीत यादव व भूषण यांच्यावर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
 
केजरीवालांवर निसर्गोपचार
पक्षातील ‘तापा’मुळे केजरीवाल यांची शुगर 300च्या वर गेली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून आजारी असलेले केजरीवाल 10 दिवसांचा निसर्गोपचार घेणार असल्याचे वृत्त आहे.