शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भोपाळ , सोमवार, 6 जुलै 2015 (10:53 IST)

व्यापमं गैरव्यवहारात 4 तासात दोन अधिष्ठातांचा गूढ मृत्यू

मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयातील दोघा अधिष्ठात्यांचे 24 तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यापमं घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींचा एकापाठोपाठ एक संशयास्पद मृत्यू होत असताना, एकाच कॉलेजमधील दोन अधिष्ठात्यांच्या गूढ मृत्यूमुळे सर्वच महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
भोपाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय कॉलेजमधील अधिष्ठाता डॉक्टर अरुण शर्मा रविवारी सकाळी दिल्लीतील द्वारका येथील उत्पल हॉटेलमधील खोलीत मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.ज्या हॉटेलमध्ये शर्मा थांबले होते. त्याच हॉटेलमध्ये रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. रविवारी ते मृतावस्थेत आढळले. ते मेडिकल काऊंसिल ऑॅफ इस्पेक्शन टीमचा एक भाग होते. येथून ते आगरतळाकडे रवाना होणार होते. त्यामुळे ते शनिवारी दुपारी जबलपूर येथून राजधानी दिल्लीत दाखल झाले. रविवारी सकाळी ७ वाजता अगरताळासाठी विमान होते. त्यासाठी ते विमानतळानजीकच्याच हॉटेलमध्ये रात्री थांबले होते. मात्र, सकाळी त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एक महिन्यांपूर्वीच शर्मा यांच्याकडे अधिष्ठातापदाचा कार्यभार देण्यात आला होता. यापूर्वी गेल्या वर्षी चार जुलै रोजी याच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डी. के. सक्काले यांचे निधन झाले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे अद्याप गूढ उकललेले नाही, तोच आणखी एका अधिष्ठातांच्या संशयास्पद मृत्यूनंतर या घोटाळ्याशी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. व्यापम घोटाळ्यात आतापर्यंत २५ आरोपी तसेच साक्षीदारांचा मृत्यू झाला आहे. या अगोदर शनिवारी एका टीव्ही चॅनलचे पत्रकार अक्षयसिंह यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. टीचर्स कॉलनीतील मेहताबसिंह डामोर यांची कन्या नम्रता डामोरच्या मृत्यूशी संबंधित वृत्त देण्यासाठी ते शनिवारी दुपारी १ वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर अडीचच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे त्यांच्याही मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 
 
युवतीसह एका पत्रकाराचाही मृत्यू   
व्यापमं गैरव्यवहारात नाव आलेल्या एका युवतीचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला होता. या युवतीच्या पालकांची मुलाखत घेणार्‍या दिल्लीतील एक पत्रकार अचानक आजारी पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. अक्षय सिंग असे मृत्युमुखी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे.