1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (10:25 IST)

शिवसेनेनकडून गुलाम अलींचा कार्यक्रम ‘पॅक-अप’

केवळ पाकिस्तानी असल्याने प्रसिद्ध गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रमास शिवसेनेने विरोध केला आणि संयोजकांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला.
 
सीमेवर भारतीय सैनिकांवर पाकिस्तानकडून हल्ला केला जात आहे आणि इकडे त्यांच्या देशातील गायकांचा कार्यक्रम होत असल्याने शिवसेने ९ ऑक्टोबर रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणारा अली यांचा गायनाचा कार्यक्रम रद्द करायला लावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यक्रमाच्या संयोजकांनी बुधवारी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर हा कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.
 
दरम्यान, या कार्यक्रमास पोलीस बंदोबस्त दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र तरीही संयोजकांनी कार्यक्रम रद्द केला.