शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार , बुधवार, 23 जानेवारी 2013 (18:38 IST)

श्री श्री रविशंकर 'गूगल प्लस हँगआउट' वर

PR
FILE
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेता आणि आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर येत्या 26 जानेवारीस पहिल्यांदा 18 देशातील प्रतिनिधींसोबत ग्लोबल ऑनलाइन वार्तालाप करणार आहेत.

गूगल हँगआउटवर ते 'हिंसामुक्त व तणावमुक्त समाज' या विषयावर चर्चा करताना आपले विचार व्यक्त करतील. आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेला हा कार्यक्रम 60 पेक्षा अधिक देशातील लाखो लोक बघतील.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संस्‍थापकांच्या मते सोशल माध्यमाच्या व्यासपीठावर जनमतासोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही. हे माध्यम समाजाच्या नाडीवर अचूक बोट ठेवते. या माध्यमात लोकांना एकत्र आणण्याची व सामाजिक बदलाची क्षमता आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, आध्यात्मिक गुरू दीपक चोपडा, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, क्रिकेटपटू कुमार संगकारा, किरण बेदी यासरखे व्यक्तिमत्व याअगोदरच गूगल हँगआउटवर आलेले आहेत.

हिंसामुक्त व चिंतामुक्त समाज निर्मितीचे श्रीश्री यांचे स्वप्न आहे. या उद्देशासाठीच त्यांन आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना केली. जगभ्रमन करून आपल्या विचारांनी त्यांनी मनूष्यजीवनात परिवर्तन घडवून आणले आहे.

श्रीश्री 'गूगल प्लस हँगआउट'वर 26 जानेवारीस सकाळी 8.30 वाजता विचार-विमर्शास सुरूवात करतील. म्हणून 26 जानेवारी, 2013 अगोदर आपले प्रश्न, समस्या या पेज वर पोस्ट करता येणार आहे.