शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2016 (11:03 IST)

समलैंगिक संबंधामध्ये गैर काय? : श्री श्री रविशंकर

बंगळुरु- समलैंगिक संबंधांमध्ये गैर काहीच नाही, असे मला वाटते. याउलट या सबंधांना बेकायदेशीर ठरवलं तर आपण खूप मागे जाऊ, अशा शब्दात सांगत श्री श्री रवीशंकर यांनी ३७७ कलम हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे.
 
ते म्हणाले,  जर समलैंगिकता हा गुन्हा ठरवला तर आपण शेकडो वर्षे मागं जाऊ. याबाबतीत सुधारणा करण्यासाठी धैर्य आणि बांधिलकीची गरज आहे. सुधारकांनी लोकांमध्ये जागृती घडवायला हवी. सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक रोगांवर इलाज करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
 
दरम्यान, रविवारी शनीशिंगणापूरच्या विश्वस्तांना भेटणार असून काशी विश्वनाथ आणि तिरुपती बालाजी या दोन मॉडेलप्रमाणे आचरण करावे असा सल्ला ते देणार आहेत. या दोन्ही ठिकाणी स्त्री-पुरूष भेदभाव नसल्याचे रवीशंकर म्हणाले.