1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

साध्वी प्रज्ञांवरील मोक्का हटवला

मालेगाव स्फोटांप्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञा यांच्यासह या प्रकरणातील आरोपींवर लावण्यात आलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोक्का हटवण्याचे आदेश आज मुंबई मोक्का न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मालेगावात झालेल्या स्फोटांप्रकरणी प्रज्ञांसह कर्नल पुरोहित यांनाही पोलिसांनी या प्रकरणी अटक केली होती.

या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावत याची सुनावणी मुंबई न्यायालयात करण्यात येत. आज मुंबई न्यायालयाने त्यांच्याविरोधातील मोक्का काढण्याचे आदेश देतानाच या प्रकरणाची सुनावणी आता नाशिक न्यायालयाकडे वर्ग केली आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाने पुरोहित आणि प्रज्ञा यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, या दोघांच्या जामिनासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.