शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 जुलै 2014 (17:43 IST)

सीमाप्रश्नावरून लोकसभेत खंडाजंगी

सीमाभागातल्या मराठी बांधवांवर सुरु असलेल्या कानडी अत्याचारावरुन बुधवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. शिवसेना खासदारांनी कर्नाटक पोलिस हाय हाय अशा घोषणाबाजी केली. त्यानंतर कर्नाटकमधील भाजपच्या खासदारांनी त्याला विरोध केला. दोन्ही पक्षाचे खासदार आमने सामने आल्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दुपारी काळासाठी तहकूबही केले होते. 
 
दरम्यान, येळ्ळूरप्रकरणामूळे कर्नाटकातील आंदोलनात महाराष्ट्र एसटी बसना नुकसान पोहोचू नये, म्हणून खबरदारी घेण्यात येतेय. उमरगा सीमा तपासणी नाक्यावर बसेस पोलिसांनी थांबवल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. महाराष्ट्र राज्याच्या एसटी बस कर्नाटक सीमेवर पोलिसांनी थांबवल्या. अनेक बसेस उमरगा सीमा तपासणी नाक्यावर अडकून पडल्या आहेत.