1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (10:47 IST)

स्नॅपडीलची बेपत्ता इंजिनिअर पानिपतमध्ये सापडली

गाझियाबादच्या वैशाली मेट्रो स्टेशनवरुन बुधवारी बेपत्ता झालेली स्नॅपडीलची सॉफ्टवेअर इंजिनिअर दीप्ती सराना ही हरियाणातील पानिपत येथे सापडली आहे.
 
तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. नेहमीप्रमाणे संध्याकाळी ६ वाजता दीप्ती गुडगावहून गाझियाबादमधील निवासस्थानी जाण्यासाठी निघाली. रात्री ८ च्या सुमारास ती गाझियाबादमधल्या वैशाली मेट्रो स्टेशनवर उतरली आणि शेअर रिक्षाने बस स्टँडच्या दिशेने निघाली. बस स्टँडहून दीप्ती नेहमी तिच्या वडिलांसोबत घरी जाते. बस स्टँडवर पोहचण्याआधीच रिक्षावाल्याने रिक्षातील एका मुलीला जबरदस्ती खाली उतरवलं आणि दीप्तीसह पोबारा केला. यावेळी दीप्ती ज्या मित्रासोबत फोनवर बोलत होती, त्यानेच या घटनेची माहिती दिली होती.